मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
कर्क : कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.
