मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास टाळावेत.
कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : कोणालाही जामीन राहू नका. कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.
तूळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
