….तर आम्ही विरोधात बसणार.. भाजपची भूमिका 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसरा टप्पा समजल्या जाणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप सर्वच पक्षांना वरचढ ठरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांवर भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेने ७५ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या सगळ्यात आता भाजपकडून एक मोठा डाव टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेत गरज पडली तर आम्ही विरोधात बसायलाही तयार असल्याचे मोठं विधान केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. ठाणे महापालिकेत १३१ जागा आहेत. त्यापैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.

राजकीय पक्षांचे बलाबल

शिवसेना (शिंदे गट) ७५, भाजप-२८, राष्ट्रवादी (शरद पवार गट)-१२, राष्ट्रवादी (अजित पवार गट)-०९, शिवसेना (ठाकरे गट)-०१, इतर पक्षांना ०६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाला जबरा फटका बसला आहे. ठाकरे बधूंची येथे जाहीर सभा होऊन देखील पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधन मानावे लागले आहे

Leave a Comment