बिग ब्रेकिंग! ओतूरजवळ भीषण अपघात, दोन जागीच ठार तर साकूर परिसरातील….

आळेफाटा – ओतूर गावच्या हद्दीतील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील कोळमाथा परिसरात मंगळवारी (ता. २७) पहाटे तीनच्या सुमारास स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात वरद एकनाथ तांबे (रा. ओतूर, ता. जुन्नर) आणि करण पवळे (रा. पिरंगुट, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभिनव गणेश वाकचौरे (रा. ओतूर) आणि ओंकार गोरक्ष शिंदे (रा. साकूर मांडवे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारचे नंदलाल लॉन्ससमोर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चालकाला झोप आल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पुढील तपास ओतूर पोलिसांकडून सुरू आहे,

Leave a Comment