मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
धनू : वेळ वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
