ब्रेकिंग! अजितदादांसह कोणाकोणाचा झाला मृत्यू, समोर आली अधिकृत नावे…..

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये आज बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बारामतीमध्ये आयोजित जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी मुंबईहून निघाले होते. सकाळी ८:१० च्या सुमारास त्यांनी मुंबईतून उड्डाण केले होते आणि ८:५० पर्यंत ते बारामतीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, गोजुबावी परिसरात लँडिंग करत असताना व्हीएसआर (VSR) कंपनीच्या या खाजगी विमानाचा ताबा सुटला आणि ते जमिनीवर कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाने तातडीने पेट घेतला आणि त्याचे अवशेष दूरवर विखुरले गेले.

अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या विमानात अजित पवार यांच्यासह एकूण ५ जण होते. यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. दुर्दैवाने या भीषण अपघातात कोणालाही वाचवता आले नाही. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली असून विमानाचा जळून झालेला चक्काचूर पाहून नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच बारामतीमध्ये दुकानांनी कडकडीत बंद पाळला आहे. खासदार सुप्रिया सुळे तातडीने दिल्लीवरून बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी, रोहीत पवार आणि इतर अनेक नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन आणि तांत्रिक पथके सध्या या भीषण अपघाताच्या कारणांचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Comment