पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी (28 जानेवारी) लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.
अजित पवार यांची बुधवारी बारामतीमध्ये सभा होती. त्यामुळे ते या विमानामध्ये असण्याची शक्यता आहे. अजित पवार यामध्ये गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 9 ते 9.30 दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखांच्या महासागरात बुडाला आहे. डीजीसीएने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
