मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
कुंभ : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
