राज्यात पुढील ‘एवढे’ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, नगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट

Rain Alert : दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या तयारीच्या हालचाली दिसायला सुरुवात झाली आहे. तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आगामी 48 तासांत म्हणजे 6 मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही परवा शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तर मराठवाड्यात नांदेड, लातूर येथे ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव येथेही राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन-तीन पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात पाचही दिवस यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment