IMD Update : राज्यभरात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत आहे. एप्रिल व मे महिना उन्हाळ्याचा असतो.
परंतु यंदा मे महिन्यात ऊन कमी असणार आहे. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाज व्यक्त केला आहे.
यामध्ये वायव्य भारतात, पश्चिम-मध्य भारताच्या अनेक भागांत मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच राज्यात गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.
