निधन वार्ता! जांबुत बुद्रुकचे संतोष शेटे यांचं निधन 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष रावजी शेटे यांचं निधन झालं आहे. वार – रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता संतोष शेटे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे जांबुतकरांवर एकच शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

संतोष शेटे हे एक धडाडीचे कार्यकर्ते होते. तसेच सामाजिक कार्यातून त्यांनी एक नवीन ओळख निर्माण केली होती. तसेच एक अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तीमत्व होते.

Leave a Comment