मुंबई – विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात बुलेटप्रुफ गाडी आणि एस्कॉर्ट वाहने असतील, अशी माहिती मिळाली आहे.
या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी २४ तास अंदाजे ५५ सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत. त्यात एनएसजी कमांडो असतील. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेट प्रुफ गाडी, तसेच अनेक एस्कॉर्ट वाहने असतील. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदी मिळाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना उच्च दर्जाची झेड प्लस सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार राज्यसभेत खासदार होत्या. त्यांना त्यावेळी एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर ३१ जानेवारीला त्यांनी उपमुख्यमंत्रि पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात यावी, असे राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी सूचविले होते.
