रऊफ शेख आणि गुलाबराजे भोसले यांच्या टोलेबाजीत बाळासाहेब सागर यांचा थेट यार्कर…एका फलंदाजावर 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटात सध्या नामदार, आमदार चषक स्पर्धेंचा धूरळा उडताना दिसत आहे. तसेच पठार भागात ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धां होत आहे. मात्र स्पर्धांच्या शुभारंभ व बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला राजकीय नेते मंडळी उपस्थित राहत असल्याचे बघायला मिळत आहे. आता राजकीय मंडळी यावेळी उपस्थित राहिले आणि भाषणाला संधी जर मिळाली तर मैदानातून नव्हे तर आपल्या भाषणातून फटकेबाजी नाही केली असं होणारच नाही.

झालही तसच कौठेमलकापूर येथे नामदार चषक पठारभाग स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं बघायला मिळाल. या फटकेबाजीची सुरूवात भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी केली. आगामी काळात गुलाबराजे टीम वर्कने कसं काम करायच हे महत्त्वाचे असणार आहे. कारण सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत टीकून राहण्यासाठी लढण महत्त्वाचे आहे असा सूचक संदेश रऊफ शेख यांनी यावेळी दिला. त्यामुळे रऊफ शेख यांच्या या वक्तव्यामुळे समझने वालो को इशारा काफी है अशी चर्चा महायुतीतच रंगली आहे.

रऊफ शेख यांच भाषण संपताच भाजपचे तालुकाध्यक्ष  गुलाबराजे भोसले म्हणाले, मी ग्राउंड सोडणार नाही. साकूर गटात सामना चांगला होईल. प्रेक्षक नाराज होणार नाही असा सामना होईल असं मिश्किल प्रत्युत्तर देत जो काय संदेश देयचा तो संदेश गुलाबराजे भोसले यांनी दोन वाक्यात देऊन टाकला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी देखील तुफान फटकेबाजी केली.‌ सामना चांगला होण्यासाठी साकूर जिल्हा परिषद गटात पंचांची भूमिका मी आणि आमदार अमोल खताळ करणार आहे. तसेच तिसऱ्या पंचाची भूमिका पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील करणार असून कोणीही गडबड करू नका अस सूचक वक्तव्य जनार्दन आहेर यांनी करत इच्छुक उमेदवारांचे कान टोचले.

मात्र भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या फटकेबाजीत आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब सागर यांनी थेट यार्कर टाकून एका फलंदाजावर बॅटिंग होत नाही त्यासाठी टीम वर्क महत्वाचा असून विरोधकांमध्ये टीम वर्क नसल्याच सूचक वक्तव्य केले आहे. तसेच एका फलंदाजावर बॅटिंग होत नाही असं वक्तव्य बाळासाहेब सागर यांनी करत महायुतीकडून अजूनही इच्छुक उमेदवार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment