अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी विमान कंपनीला तर धारेवर धरलेच आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अजित पवार यांचा १०० टक्के घातपातच झाला असल्याचा त्यांनी म्हटले. आता रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतलेय. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच अजित पवार यांना २७ तारखेला मंत्रालयातून निघण्यास उशीर झाला, अन्यथा दादा रस्ते मार्गाने पुण्याला जाणार होते, असे रोहित पवार म्हणाले. अजित दादा २७ तारखेला गाडीने पुण्याला गेले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीनेच बारामतीला गेले असते, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असेही रोहित पवार म्हणाले.
२७ जानेवारी रोजी सायंकाळी अजितदादा बारामतीला रस्ते मार्गाने जाणार होते. पण मंत्रालयातील काही कामांमुळे त्यांना जास्त उशिर झाला. त्यामुळे अजित पवार यांनी २८ तारखेला विमानाने बारमातीला जाण्याचा निर्णय घेतला, असे रोहित पवार म्हणाले. १० तारखेच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पूर्व विदर्भातील नेत्यामुळे अजित पवारांना उशिर झाला. त्यामुळे त्यांनी रस्ते मार्गाने जाण्याऐवजी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर पूर्व विदर्भातील तो नेता कोण? याची चर्चा सुरू झाली होती. रोहित पवार यांनी आता थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेय. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच अजितदादा यांना उशीर झाला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपावर आता प्रफुल्ल पटेल काय उत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, रोहित पवार सोमवारी अथवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत
