अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी आईला त्याने मारहाण केली त्यानंतर भिंतीवर डोके आपटले आणि चाकू व अडकित्त्याच्या सहाय्याने मुलाने आईची हत्या केली. धक्कदायक म्हणजे दोन तास आईच्या मृतदेहाजवळ तो खेळात बसला होता. ही घटना अहिल्यानगर येथील सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
काय घडलं नेमकं?
बेबी गवारे (वय 60) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सुहास गवारे उर्फ मामा असं आरोपीचं नाव आहे. अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली. आहे. संशयित सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती किरकोळ कारणातून आईला मारहाण करत भिंतीवर आपटले व चाकू व अडकित्ताच्या सहाय्याने आईची हत्या केली असं प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेनंतर दोन तास त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते.
पोलिसांनी काय दिली माहिती?
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, आई आणि मुलगा दोघे भाड्याच्या घरात रहात होते. दुपारी तीनच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. त्याच्याआधारे आम्ही येथे पोहोचलो. तर घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. बेडरुमचा दरवाजा बंद होता. तो तोडून आम्ही आत गेलो. त्याठिकाणी आरोपी बसला होता. त्याच्या हातात कात्री होती. यानंतर त्याला ताब्यात घेतले असून महिलेचं शव पोस्ट मार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. हत्येचं कारण चौकशीनंतरच समजू शकेल.’
