बायकोचा छळ टोकाला, नवऱ्याने थेट चौथ्या मजल्यावरून……

पुण्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. बायकोने छळ केल्यामुळे वैतागलेल्या पतीने चक्क चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातल्या वारजे परिसरात घडली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

चौथ्या मजल्यावरुन उडी घेत जीव दिलेल्या व्यक्तीचं नाव महेश क्षीरसागर असं आहे. महेश यांचं वय ४० वर्षे होतं, ते वारजे भागातल्या गिरीधरनगरमध्ये वास्तव्याला होते. महेश यांचं १३ वर्षांपूर्वी प्रतिभा (वय ३५) यांच्यासोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. २ फेब्रुवारी रोजी याच जाचाला वैतागून महेश क्षीरसागर यांनी चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली.

या घटनेत महेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी महेश यांचे वडील दत्तात्रेय क्षीरसागर यांनी १६ फेब्रुवारी रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सून प्रतिभा यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिभा क्षीरसागर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. कौटुंबिक वादातून एवढ्या टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पोलिस तपासामध्ये पुढे काय येते, हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment