मेष – धंद्यात जम बसेल. फायदा वाढेल. तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. मागील थकबाकी वसूल करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
वृषभ – अडचणी कमी होतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. धंद्याला कलाटणी मिळेल.
मिथुन – मनाची द्विधा अवस्था होईल. खर्च वाढेल. पाहुणे येतील. संयमाने वागल्यास समस्या वाढणार नाही.
कर्क – तुमचे वागणे लोकांना संशयास्पद वाढेल. वाद वाढेल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.
सिंह – उत्साहवर्धक घटना घडेल. व्यवसायात लाभ होईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धा आकर्षक होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
कन्या – रेंगाळलेले काम पूर्ण होईल. जनसंपर्क वाढेल. मैत्री करण्यात यश मिळेल. कला क्षेत्रात पुढे जाल.
तूळ – घरातील जवळच्या माणसाबरोबर मन मोकळे करता येईल. खाण्याची चैन कराल. पाहुणे येतील. खरेदी कराल.
वृश्चिक – धावपळ वाढेल. थकवा वाटेल. आळस करू नका. धंद्यात लक्ष द्या. तणाव व वाद होऊ शकतो.
धनु – घरातील तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या मदतीने तुमचे काम होऊ शकेल. प्रवासात नवीन परिचय होईल.
मकर – तुमचे मत इतरांच्यावर लादू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. वादाचा प्रसंग येईल. संयम ठेवा.
कुंभ – मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. प्रवासाचा बेत ठरवाल. धंद्यात फायदा होईल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल.
मीन – धंद्यात बरकत येईल. कोर्टाची कामे लांबतील. तब्येत उत्तम राहील. प्रवासाचा बेत आखाल. रागावर ताबा ठेवा.
