महाड : माजी आमदार माणिक जगताप (Manik Jagtap) यांच्या कन्या आणि महाडचं नगराध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप या आता शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश करणार आहेत.
महाडच्या चांदे क्रीडांगणावर शनिवारी (ता. 6) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाडचा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेतही मिळत आहेत.
अनेक वर्षे काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल यांचा ठाकरे गटातील प्रवेशाच्या वृत्तामुळं राजकीय खळबळ उडाली आहे
