संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठारभागात एक धक्कादायक घटना घडल्याच समोर आलय. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीवर एका नराधम शिक्षकाने बलात्कार केल्याच उघडकीस आल्याने पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. अमोल बाबासाहेब भोसले रा. वरवंडी, ता. संगमनेर असे या नराधम शिक्षकाचे नाव असून त्याला घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने संपूर्ण पठारभागसह अहिल्यानगर जिल्हा हादरून गेला आहे.
दरम्यान या घटनेनंतर घारगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. कुठलीही कानकुस न लागू देता रात्रीच्या सुमारास वरवंडी येथील राहत्या घरातून झोपेत असलेला नराधम शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले याला घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. तसेच आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासकामी घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी काम पाहिले.
