जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील दुय्यम बाजार आवारात रविवारी (दि. १) कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली. या उपबाजारात रविवारी १० हजार ८६७ गोण्यांची आवक होत तब्बल ५४३३ क्विंटल कांदा दाखल झाला.
आळेफाटा उपबाजार आवारात लिलावाचे दिवस मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता लिलावास सुरुवात होते आणि जोपर्यंत सर्व वाहनांचे व्यवहार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.
१० किलोचे बाजारभाव खालीलप्रमाणे राहिले
नव्या सुपर मोठ्या साईजचा १ नंबर गोळा १२० ते १३१ रुपये, सुपर कांदा ११० ते १२० रुपये, सुपर मीडियम ९० ते ११० रुपये, गोल्टी व गोल्टा ७० ते ९० रुपये आणि बदला व चिंगळी कांद्याला ३० ते ६० रुपये दर मिळाला. मोठ्या साईजच्या नव्या कांद्याला १३१ रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला.
