मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लग्नात गोळीबार, हल्लेखोर ताब्यात 

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत.

फारुख अब्दुल्ला बुधवारी (11 मार्च) जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित होते. लग्न समारंभ आटोपून जात असताना हल्लेखोर कमल सिंग जामवालने मागून फारुख अब्दुला यांच्या मानेवर बंदूक ठेवली. यादरम्यान, फारुख अब्दुला यांच्या सोबत असलेल्यांकडून हल्लेखोर कमल सिंग जामवालची धरपकड करण्यात आली.

फारुख अब्दुल्ला यांच्या मानेवर बंदूक ठेवणारा कमल सिंग जामवाल कोण?

फारुख अब्दुल्लावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराचे नाव कमल सिंग जामवाल आहे, तो जम्मूच्या पुरानी मंडी परिसरातील रहिवासी आहे. वृत्तानुसार, कमल सिंगचा जन्म 1963 मध्ये झाला होता. जम्मूच्या जुन्या शहर परिसरात त्याची अनेक दुकाने आहेत. या दुकानांच्या भाड्याने तो आपला उदरनिर्वाह करतो. आतापर्यंतच्या चौकशीत, आरोपीने उघड केले आहे की तो 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारण्याचा विचार करत होता. तो म्हणाला, मी 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारू इच्छित होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता.

Leave a Comment