नाशिकमधील गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.
न्यायालयात मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त
खरातला कोर्टात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. सुनावणी पाहण्यासाठी वकिलांचीही मोठी गर्दी झाली होती.
SIT कडून गंभीर आरोप
सुनावणीदरम्यान SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची माहिती मांडताना अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. आरोपी महिलांना खडे, पेढे देऊन आणि पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
तर सरकारी वकिलांनी 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळा रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिल्याचा संशय आहे. हा 67 वर्षाचा आहे, तो 30 वर्षाच्या मुलीशी लैगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते, असे म्हटले.
‘सिद्ध पुरुष’ असल्याचा दावा, फसवणुकीचे जाळे
अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत होता, असा आरोपही करण्यात आला. साप, वाघ यांचा वापर करून भीती निर्माण केली जात होती. तसेच कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
बचाव पक्षाने मात्र सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
सरकारी पक्षाची ठाम भूमिका
सरकारी वकिलांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर गंभीर बाबींचा तपास अजून बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, गंभीर आरोप आणि तपासातील नव्या बाबी लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
कोर्टात काय म्हणाला अशोक खरात?
दरम्यान, पोलीस कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काही बोलायचं आहे का? असे विचारले. यावर अशोक खरात म्हणाला की, मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरामध्ये कधीतरी जायचो, त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र, श्रावणी सोमवारी अशा वेळी मी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरे दिली आहेत. मला साप, वाघ याबद्दल काही माहिती नाही, असे त्याने म्हटले.
अशोक खरातला कोठडी, कोर्टात काय काय घडलं?
1. पोलिसांच्या गराड्यात 3.50 वाजता अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणले.
2. न्यायालयाने पुकरल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला.
3. SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी गुन्ह्याची माहिती दिली.
4. आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला घ्यायाचा. त्यानंतर मळमळ व्हायची, अशी माहिती दिली.
5. पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे.
6. आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. ते कुठे फायर केले ते बघायचे आहे.
7. आरोपी स्वतःला सिद्ध पुरूष सांगत तो फसवणूक करायचा.
8. आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे तपासायचे आहे.
सरकारी वकील काय म्हणाले?
1. कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता. त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत.
2. 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे.
3. 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिलाचा संशय आहे.
4. अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते.
5. फायर झाल्याने नरबळी दिल्याचा संशय आहे.
6. वाघ, साप, नाग दाखवत होता ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे.
7. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे.
8. फॉरेस्ट अॅक्ट लागू शकतो. 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, व्याप्ती मोठी आहे.
9. सात दिवसांचा pcr या आधी दिला आहे.
10. सेक्स, फ्रॉड आणि प्रॉपर्टी असा हा गुन्हा आहे.
11. त्यामुळे 7 दिवसाची कोठडी मिळावी ही मागणी आहे.
12. कारण यातून समाजाला संदेश जाणार आहे.
अशोक खरातचे वकील काय म्हणाले?
1. सात दिवसापासून तपास सुरू आहे. त्यामुळे रिमांड ची गरज नाही2. काही व्हिडीओ जमा केले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
3. Dvr, लॅपटॉप मिळाले आहेत, पैसे मिळाले, रिव्हॉल्वर मिळाले असे म्हणतात. पण पेन ड्राईव्ह कुठे उल्लेख आला नाही
5. कोणते शोध आता बाकी नाहीत
6. जे द्रव्य पाजले गेले त्यासाठी pc वाढवून मागत आहेत
7. 7 दिवस रिमांड दिली आहे त्यामुळे पुन्हा रिमांड ची गरज नाही
8. अजून कोणते डॉक्युमेंट घ्याचे नाहीत,रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्रे मिळू शकतात त्यामुळे रिमांड ची गरज नाही
अशोक खरातने कोर्टात काय केलं?
1. युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता. आपले बोट बघत होता.
2. कोठडी सुनवण्याआधी न्यायाधीश यांनी खरातला काssहो बोलायचं आहे का विचारले. यावर मला साप, वाघ, या विषयी काही माहिती नाही, असं खरात म्हणाला.
3. न्यायालायने 5 दिवसांची कोठडी सुनावली.
4. 29 मार्चपर्यत अशोक खरातला पोलीस कोठडी.
