बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना शरद पवारांनी दिलं मोठं गिफ्ट 

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे.या भेटीदरम्यान शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला 12 लाख रूपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. तर अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे यासाठी 50 लाख रूपयांची मदत केली आहे.

मुंबईत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान शरद पवार यांनी पुढील 2 वर्षासाठी 50 हजार प्रमाणे 12 लाखाचा चेक दिला आहे. त्यासोबत काकासाहेब पवार यांच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला 50 लाख रूपयाची मदत केली आहे. या मदतीने काकासाहेब पवार यांना आता आणखी महाराष्ट्र केसरी घडवता येणार आहेत. या भेटी दरम्यान अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची आम्ही सर्व पैलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणा केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे आणि प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केल्याचे काकासाहेब पवार यांनी सांगितले.

Leave a Comment