पंढरपूर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यामुळे बाकी राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर अभिजित पाटील हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे 2024 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता राकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा खूप दिवसांपासून रंगली होती. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित हेाते.
