कर्नाटकमध्ये कोणाच सरकार येणार? शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं…..

Solapur : कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यावरुन शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.

येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी, कर्नाटकात भाजपवर जनता नाराज आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर पवार यांनी भाजपची आता पाच-सहा राज्यात सत्ता असल्याचे सांगून भाजपला डिवचले आहे.

शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. त्या ठिकाणी काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. तर अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. केरळ, तामिळनाडू राज्यात भाजपची सत्ता नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये सत्ता नाही. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात भाजपची सत्ता आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंमुळे भाजपची सत्ता आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तेथे काही आमदार फोडून भाजपने आपली सत्ता आणलेली आहे.

हरियाणा, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. आज केवळ पाच चे सात राज्यामध्ये सत्ता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment