ठाणे: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पांजार पुलावर झाला मोठा अपघात झाला. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी घडली घटना घडली. इको गाडीतून मुरबाड मधील काही रहिवाशी कल्याणला जात होते. – याच दरम्यान पांजार पुलावर मोठा अपघात झाला. अपघातात एक आज्जी आश्चर्यकारक रित्या बचावली आहे.
प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांची मदतीसाठी धाव, पोलिसांकडून पंचनामा सुरू
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
