पुण्यात BLO म्हणून काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील प्राध्यापकाचा मृत्यू

पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरु केली आहे. यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीला जाताना अपघात होऊन लोहगाव येथील एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर रोटे (वय 40, रा. रोटेवाडी, रावळगाव अहिल्यानगर) असे मयत प्राध्यापकांचे नाव आहे. मतदार शोधण्याच्या कामाच्या दडपणात हा अपघात झाल्याचा शिक्षकांनी आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 एप्रिल) दुपारी साडेबारा वाजण्याच्या प्राध्यापक रोटे हे आपल्या दुचाकीवरून उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीला चालले होते. धानोरी लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर आले असता त्यांचा अपघात झाला. त्यांची दुचाकी घसरली आणि ते चेहऱ्यावर पडून त्यांना जखम झाली. यात त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्राध्यापक रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे होते. इंदापूर तालुक्यातील कळंब येथून त्यांची नुकतीच लोहगाव येथे बदली झाली होती. ते वडगाव शेरी मतदारसंघात बीएलओ म्हणून मतदार याद्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा, अकरा वर्षांची एक मुलगी आहे

Leave a Comment