मोठी बातमी! उद्धव ठाकरे नव्हे तर “या” नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी…

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे.

अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नको असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. आज अखेर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार नसल्याची माहिती देत अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी माहिती दिली आहे. या आधीही दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे.

संजय राऊतांनीही दिली माहिती

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. राऊत यांनी म्हटले की, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.

Leave a Comment