पारनेर(DSNews24/किरण पुरी) हरिश्चंद्रगड गडावरून उगम पावणाऱ्या मुळामाईंच्या नदी किनारी वसलेल्या आणि शंकर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पारनेर तालुक्यातील देसवडे गाव होय. राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि शेती व्यवसायात अग्रेसर असलेल्या या देसवडे गावातील जुन्या जाणत्या पीढीतील तसेच संपूर्ण संगमनेर व पारनेर तालुक्यात परिचित असणारे देसवडे गावचे माजी चेअरमन श्री. भाऊसाहेब मंजाबा टेकुडे यांचा एक आगळावेगळा दबदबा आहे. याच व्यक्तीमत्वाचा दि. ३ मे २०२६ रोजी ६५ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे.
माजी चेअरमन भाऊसाहेब टेकूडे यांनी आपलं आयुष्य अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात घालवल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तनाचा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य सुनील महाराज पवार, संपत महाराज दानवे, मृदंगाचार्य अनिल महाराज टेकुडे व रुपेश महाराज नाईकवाडी उपस्थित राहणार आहेत.
देसवडे गावच्या जडणघडणीमध्ये भाऊसाहेब मंजाबा टेकुडे यांचा सिंहाचा वाटा आहे. गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रात नेहमीच ते सहभाग होता आहे. तसेच ते सतत विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असतात. विशेषतः वारकरी संप्रदायात उल्लेखनीय काम देखील त्यांनी केले आहे. दरवर्षी परिसरातून शंकर स्वामी अखंड पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीचे प्रमुख म्हणून भाऊसाहेब टेकूडे आहे.
देसवडे गावासह परिसरातील घरगुती वाद-विवाद, तंटे निष्पक्ष:पाती मिटवण्याचे काम देखील ते करत असतात. आपल्या घरच्या प्रपंच्यात गुंतून न राहत आजपर्यंत आपलं अख्ख: आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी घालवले आहे. ज्येष्ठ व्यक्तीमत्त्वाचा आदर सत्कार करून सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदर सत्कार करून सन्मान करण्यासाठी परिसरातील वारकरी, शेतकरी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केले आहे
