बिग ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत मोठे विधान केले आहे.

फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करुन टाकले. सरकारंही तयार करून टाकली.

मला असं वाटते की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठे न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केले आहे ते सगळे कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment