Political : महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप

Political : राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असतानाच, महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत त्याची महाराष्ट्राला प्रचिती येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहे, असे मंत्री उदय सामंत ठामपणे म्हणाले.

Leave a Comment