मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनु : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल
