CM एकनाथ शिंदेंसह ‘या’ १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

अकरा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या (BJP) पाठिंब्याने सरकार स्थापन केले. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचले होते.

त्यांनतर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. ती सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल (Result) राखून ठेवला होता. यानंतर अखेर उद्या (दि. ११ मे) रोजी सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निर्णय देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांची धाकधूक वाढली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केले होते. मात्र, ठाकरे गटाकडून १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या १६ आमदारांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावर उद्या न्यायालय निर्णय देणार असून ते १६ आमदार नेमके कोण आहेत? हे जाणून घेणार आहोत.

‘या’ १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघ-कोपरी पाचपाखाडी

तानाजी सावंत मतदारसंघ-भूम परंडा

अब्दुल सत्तार मतदारसंघ-सिल्लोड

यामिनी जाधव मतदारसंघ-भायखळा

संदीपान भुमरे मतदारसंघ-पैठण

भरत गोगावले मतदारसंघ-महाड

संजय शिरसाठ मतदारसंघ-छत्रपती संभाजीनगर पश्चिम

लता सोनावणे मतदारसंघ-चोपडा

प्रकाश सुर्वे मतदारसंघ-मागाठाणे

बालाजी किणीकर मतदारसंघ-अंबरनाथ

बालाजी कल्याणकर मतदारसंघ-नांदेड उत्तर

अनिल बाबर मतदारसंघ-खानापूर

संजय रायमूलकर मतदारसंघ-मेहेकर

रमेश बोरनारे मतदारसंघ-वैजापूर

चिमणराव पाटील मतदारसंघ-एरोंडोल

महेश शिंदे मतदारसंघ-कोरेगाव

Leave a Comment