मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राजीनामा 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला.

यामधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय झाला. यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. आज सकाळीच त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्या होत्या. उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.

4 मे रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्वपूर्ण पोटनिवडणूकांचे निकल जाहीर झाला. यामध्ये बारामतीमध्ये ऐतिहासिक निकाल लागला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवत मोठ्या मताधिक्यांनी त्या निवडून आल्या. या विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, यामुळे त्यांना खासदार हे पद सोडावे लागले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० मते मिळवत अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. या विजयासह त्यांनी २०१९ मध्ये अजित पवारांनी प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला असून बारामतीत एक नवा इतिहास रचला आहे.

Leave a Comment