बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ‘ईडी’ची नोटीस

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे. आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) देणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

प्रकरण नेमकं काय?

आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.

आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

Leave a Comment