Sanjay Raut : महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.
