सर्वात मोठी बातमी! पेट्रोल – डिझेल आजपासून महागले, किती रूपयांची वाढ?

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झालेला दिसून येत आहे. देशभरात तसेच राज्यात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे.

किती रुपयांची वाढ?

नव्या दरांनुसार महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमतीत 3.16 रुपये तर डिझेलच्या किमतीत 3.10 रुपयांची वाढ झाली आहे. हे नवीन दर आजपासून सर्व पेट्रोल पंपांवर लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे वाहनधारकांवर आणि वाहतूक क्षेत्रावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. दैनंदिन प्रवास खर्च वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली – पेट्रोल 97.77 रुपये, डिझेल 90.67

मुंबई – पेट्रोल 106.68 रुपये , डिझेल 93.14

कोलकाता – पेट्रोल 108.74 रुपये, डिझेल 95.13

चेन्नई – पेट्रोल 103.67 रुपये, डिझेल 95.25

Leave a Comment