छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता काही तासांत जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अनेक नेते मंडळींकडून तर्कवितर्क लावले जात आहे.
यातच आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे साहेब यांच्या संपर्कात आहेत. कारण शिंदे गटात ते सर्वात शेवटी गेले होते. त्यामुळे ते 16 मध्ये आले नाही, यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. यांच्या गटातील अनेक जण आता फुटणार आहेत.
त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल मात्र काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल,” असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
