दरवर्षी देशात सर्वात अगोदर केरळमध्ये मान्सून प्रवेश करतो. त्यानंतर संपूर्ण देशभर मान्सून दाखल होते. यावेळी 26 मे रोजीपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून साधारण 1 जून रोजी दाखल होत असतो. यावेली मात्र तो लवकर केरळमध्ये येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून वर सरकतो. तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यांत प्रवेश करतो. यंदा 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून दाखल होत असताना मुंबईत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
10 जून रोजी महाराष्ट्रात आल्यानंतर येत्या 15 जून रोजी मान्सून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये 25 जून ते 5 जुलैपर्यंत मान्सून पोहोचू शकतो
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याआधी अगोदर हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. पावसाची स्थिती कशी असेल, मान्सून नेमका कधी येईल? या बाबी समोर ठेवूनच शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी, असे सांगितले जात आहे.
