घरात एकटीच होती विवाहित तरूणी, अचानक मित्र घरात घुसला अन्…. पुढ जे घडलं ते भयानकच 

नाशिकमधील मखमलाबाद रोडवरील जाधव कॉलनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका विवाहित महिलेनं आपल्या राहत्या घरात फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत एका संशयिताने तिच्या घरात घुसून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चाकूचा धाक दाखवत तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर २९ वर्षीय विवाहितेने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय गणेश कोठुळे (वय २८, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.

जुन्या ओळखीचा गैरफायदा आणि अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही दोन ते तीन वर्षांपूर्वी संशयित जय कोठुळे याच्या ऑफिसमध्ये कामाला होती. या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी (दि. १९) दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास विवाहित महिला घरील एकटीच होती. तिची दोन्ही मुलं घराबाहेर खेळायला गेली होती. घरात कुणी नसल्याचं हेरून संशयित जय कोठुळे हा जाधव कॉलनी परिसरातील पीडितेच्या घरात घुसला.

‘तू मला नाही म्हणू नकोस’

घरात प्रवेश करताच त्याने थेट स्वयंपाकघरातील भाजी कापण्याचा चाकू हातात घेतला आणि पीडितेच्या जवळ गेला. त्याने पीडितेला सोफ्यावर ढकलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच “मी तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने आलो आहे, तू मला नाही म्हणू नकोस. जर तू नकार दिलास तर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन,” अशी धमकी देखील दिली.

आरोपी एवढ्यावरच न थांबला नाही, तर त्याने पीडितेला धमकावत म्हटलं की, “तुला दोन दिवसांची मुदत देतो, तुझी काय इच्छा आहे ते मला सांग.” असे बोलून तो घटनास्थळावरून पसार झाला. या भयानक प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली. तिला मानसिक धक्का बसला. यातून तिने घरात असलेलं फिनाईल पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

विवाहितेवर उपचार सुरू

हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने रुग्णालयात दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित जय कोठुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Comment