घारगाव पोलिसांची मोठी कारवाई ; दरोडेखोरांची टोळी जेरबंद

संगमनेर(DSNews24)तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस स्टेशन हद्दीत सशत्र दरोडा टाकणारी आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी एअरगन ,धारदार कोयता, मोबाईल, दुचाकी सह एकूण २ लाख ८१ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमालासह घारगाव पोलिसांनी कुख्यात पाच दरोडेखोर जेरबंद केले आहे.

तालुक्यातील पठार भागात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून पुणे ते नाशिक प्रवास करणारे दुचाकीस्वार किशोर बाळकृष्ण राऊत रा.समर्थनगर वडाळा , पाथर्डी रोड नाशिक हे आपल्या दुकाचाकी क्रमांक एम एच १५ सी डब्लू ३६८२ वरून आपल्या राहत्या घरी नाशिकला जात असताना शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास माळवाडी, बोटा शिवारातील साकुर ढाब्याजवळ आले असताना पाठीमागून तीन मोटर सायकलवर स्वार होत सहा दरोडेखोरांनी यांना अडविले. तू आमच्या अंगावर का थुंकला म्हणून लाथा बुक्यांनी मारहाण करत हात फॅक्चर केला. गन पिस्टलचा धाक दाखवत पाकीट काढून घेतले.त्यात रोख रक्कम सह इतर कागदपत्र होते.तर मोटर सायकल घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल व अज्ञात चोरट्यांचा तपास करत असताना घारगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. संतोष खेडकर यांचे मार्गदर्शन नुसार पो. कॉ. कैलास देशमुख, पो. हे.कॉ गणेश लोंढे,पो.ना. राजेंद्र खैरे,पो. ना.किशोर लाड,पो. हरीचंद्र बांडे,पो.अनिल भांगरे,पो. वर्षा शिंदे हे आरोपींचा कसोशीने शोध घेत होते.यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून या कुख्यात दरोडेखोरांची गुप्त माहिती मिळाली.

मिळालेल्या माहिती नुसार घारगाव पोलिसांनी घारगाव घारगाव परिसरात सापळा लावून पाच आंतरराज्यिय दरोडेखोरांना जाळ्यात अडकवले आहे.त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता.वरील गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात रोख रक्कम, धारदार कोयता, एअर गन, दोन मोटरसायकल ,आठ मोबाईल, तर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यात आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीतील १) परशुराम आप्पा मोरे (वय २२) राहणार रेणुका नगर शेवगाव तालुका शेवगाव, अहमदनगर,मूळ राहणार आंबेडकर चौक मुरुड,२) सचिन दगडू कासार (वय २१) निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ३) सलमान अहमद पठाण (वय १९) राहणार मराठी शाळेजवळ पाथर्डी, तालुका पाथर्डी ,जिल्हा अहमदनगर,४) मुकुंद असलकर (वय २०) राहणार कसबा पेठ पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, तसेच एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन मार्च रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. त्यांच्याकडे सकोल चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबूल दिली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश बोला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचे मार्गदर्शनानुसार घारगाव पोलीस ठाण्याचे पो.हे कॉ .कैलास देशमुख सह पोलिस पथकाने केली आहे.

यादरम्यान या आंतरराज्यिय दरोडेखोर टोळीने घारगाव, सुपा, पाथर्डी, पुण्यात आठ गुन्हे केले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. चार जणांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक असलेल्या चार जणांनी अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव, सुपा ,पाथर्डी आणि पुणे जिल्ह्यातील खेड ,चाकण, शिक्रापूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. परशुराम मोरे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर आणि पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment