नवी दिल्ली(DSNews24) मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. तसेच याआधी ६ जुलै २०२२ रोजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
तर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ३५० रुपयांनी वाढ झाली आहे.
