सर्वात मोठी बातमी! पेट्रोल – डिझेलचे दर पुन्हा वाढले, तब्बल “एवढ्या” रूपयांनी….

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये आता चाैथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.

नव्या किमती आज सकाळपासून देशभरात लागू करण्यात आल्या. हा सर्वसामान्य नागरिकांकरिता मोठा दणका म्हणावा लागेल. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. इराण युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचा तुटवडा आहे. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत मोठी वाढ होत आहे. त्याचाच हा परिणाम भारतात बघायल मिळतोय.

देशभरात आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 2.61 रूपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.71 ने वाढ झाली आहे.

Leave a Comment