सत्यजित तांबे मविआचे की महायुतीचे? आधी कॉंग्रेसन स्पष्ट करावं – शैलेश फटांगरे

संगमनेर(DSNews24) संगमनेर तालुक्यात काँग्रेस निष्ठेवर बोलणारे काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी आपल्या स्वतःच्या नेत्यांचा राजकीय इतिहास जनतेच्या समोर मांडावा मगच दुसऱ्यावर टीका करावी. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतः पहिली निवडणूक अपक्ष म्हणून काँग्रेसविरोधात लढवली होती. तसेच त्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पदवीधर आमदार देखील काँग्रेस विरोधात निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने निष्ठेचे दाखले देण्यापेक्षा पदवीधर आमदार हे नेमके महाविकास आघाडीचे आहेत की महायुतीचे?” याबाबत काँग्रेस पदाधिकारी म्हणून अजय फटांगरे व सोमेश्वर दिवटे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करण्याच थेट आवाहन शैलेश फटांगरे आणि आ. अमोल खताळ पाटील समर्थकांनी केल आहे.

तसेच संगमनेर नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष म्हणून न लढवता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षावर लढवण्यात आली. काँग्रेसचा झेंडा गुंडाळून फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा लाल पट्टा खांद्यावर घेण्याची वेळ का आली?असा सवाल फटांगरे आणि समर्थकांनी उपस्थित केला जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात स्वतःला काँग्रेसचे निष्ठावान नेते समजत असतील, तर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि झेंडा बाजूला ठेवण्यामागचे कारण जनतेसमोर स्पष्ट करावे, असा सवाल शैलेश फटांगरे आणि समर्थकांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचा विचार आणि पक्ष चिन्ह बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हा वर निवडणूक लढवणे,म्हणजे पक्ष गहाण ठेवण्यासारखेच होते. मग त्यावेळी ही कोणती पक्षनिष्ठा होती? याचे उत्तर काँग्रेस पदाधिकार्यांनी जनतेला द्यावे,अशी मागणी करण्यात आली. टेंडरसाठी गुप्तपणे महायुती च्या नेत्यांमागे फिरणाऱ्या अजय फटांगरे यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असा टोला देखील शैलेश फटांगरे आणि समर्थकांनी लगावला. तसेच जिल्हापरिषद सदस्य असताना ज्यांना बोटा गटात विकास कामे न करता काँग्रेस कार्यकर्ते नाराज करून स्वतःचे कार्यकर्ते सांभाळता आले नाही त्यांना आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर टीका करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही असा टोला समर्थकांनी लगावला.

राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ संगमनेरमध्ये आल्यानंतर त्यांनी राज्य व देशाच्या राजकारणा वर मोठमोठ्या भूमिका मांडल्या, मात्र स्थानिक पातळीवरील राजकीय सोयीस्कर भूमिका आणि निवडणुकांमधील तडजोडींवरती काँग्रेसचे पदाधिकारी आणि ऑल इंडिया फरवर्ड पक्षाचे पदाधिकारी मौन का बाळगतात, अशी टीकाही शैलेश फटांगरे व समर्थकानी केली.

आमदार अमोल खताळ पा.यांनी घेतलेल्या सर्व राजकीय भूमिका या संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी घेतलेल्या आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधणे हे नेतृत्वाचे लक्षण असते. मात्र फक्त पत्रकार परिषद घेऊन टीका करण्या पेक्षा प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन काम करण्याची गरज असल्याचे ही शैलेश फटांगरे आणि समर्थकांनी म्हटले आहे. आज संगमनेरमध्ये जनतेच्या मनात कोणते नेतृत्व आहे हे मैदानात दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा पत्रकार परिषदेतून निष्ठेचे दाखले देण्यापेक्षा जनतेसमोर स्पष्ट भूमिका आणि विकासकामे मांडावीत, असा टोला देखील यावेळी शैलेश फटांगरे आणि समर्थकांनी लगावला आहे

Leave a Comment