अबब! अर्ध्यावर संसार मोडला, महिन्यापुर्वी साखरपुडा, लॉजवर गेला अन्…..

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये २५ वर्षीय तरुणाचा भयावह अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

रवींद्र संजय मोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचा महिनाभरापूर्वी विवाह ठरला होता. अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. मात्र अशातच त्याचा लॉजवर मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नातेवाईकांनी रवींद्रसोबत घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये रवींद्र मोरे नावाच्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्याला लॉजमधून काढून तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं.

रवींद्रच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात खळबळ उडाली. अवघ्या महिनाभरापूर्वीच साखरपुडा झालेला रवींद्र असं टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही, असा ठाम दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रवींद्रने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात करण्यात आला असावा, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर नातेवाईकांनी रवींद्रचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास होत नाही, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकारानंतर बराच वेळ पाचोरा पोलीस ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रवींद्र लॉजवर कुणाला भेटायला गेला होता? तिथे इतर कुणी होतं का? त्याने आत्महत्या केली ही हत्या झाली? याचा सविस्तर तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

Leave a Comment