मांडवे बुद्रुक येथील चौगुले वस्तीवर वादळाने घराचे पत्रे उडाले 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे परिसरात हाहाकार उडाला होता. वादळी वाऱ्याने मांडवे बुद्रुक शिवारातील चौगुले वस्ती येथील अश्पाक युनूस पठाण यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेल्याची घटना घडलीय. दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने पठाण कुटुंबिय घरात होते.

या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने त्यांच्या घराचे पत्रे अचानक उडून गेल्याने एकच खळबळ उडाली. तसेच जोराचा पाऊस सुरू असल्याने राहत्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य पावसाने भिजून गेले. मात्र घराचे पत्रे उडून दूरवर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र यामध्ये पठाण कुटुंबियांचे मोठ नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी केली जात आहे.

Leave a Comment