संगमनेर (DSNews24 /किरण पुरी ) तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जवळपास १ तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने थैमान घातल.
त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच धांदल उडाली. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. या वादळी वाऱ्याने साकूर – मांडवे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूकीसाठी खोळंबा झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत आहे.
