मान्सूनबाबत मोठी अपडेट… महाराष्ट्रात “या” तारखेला मुसळधार पावसाची शक्यता

15 जूनला राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनचा पत्ता नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून 20 जूनपर्यंत मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, सध्याची स्थिती बघता राज्यात 29 जूनलाही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता कमीच आहे.

मॉन्सून सध्या स्थितीला अजूनही आहे, तशाच स्थितीत आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्यामुळे मॉन्सूनला अडथळा निर्माण होत आहे. मॉन्सून अरबी समुद्रात असून पुढे सरकत नाही. हीच स्थिती जर पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सध्याची मॉन्सूनची वाटचाल पाहत राज्यात मॉन्सून 20 जूनला देखील दाखल होण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनो सक्रिय असल्याने स्थिती अधिक गंभीर आहे. राज्यातील मॉन्सूनवर या एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी याबाबत मोठा इशारा दिला.

Leave a Comment