अहिल्यानगर हादरले! आईने दीड वर्षांच्या चिमुकल्यासह संपवल जीवन

राहुरी – तालुक्यातील कोळेवाडी येथे एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला फासावर लटकवून नंतर स्वतः गळफास घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना दि. 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राहुरी तालुका हादरला असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आशा सुर्यभान आंबेकर (वय 31) व शिवांश सुर्यभान आंबेकर (वय दीड वर्षे, रा. चोपडे वस्ती, कोळेवाडी, ता. राहुरी) असे मृतांची नावे आहेत.

आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः गळफास का घेतला ? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Leave a Comment