भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर यांच्या उपोषणाला पाठिंबा 

बुलढाणा(DSNews24/किरण पुरी) बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाला चार दिवस झाले असून तुपकरांची तब्येत खालवाल्याची माहिती समोर आलीय. यादरम्यान तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आहे.

डॉक्टरांच्या अहवालनुसार तुपकर यांच्या शरीरातील साखरेच प्रमाण हे अतिशय कमी झालं असून त्यामुळे त्यांच्या किडनीवर ही परिणाम झालाय. मात्र रविकांत तुपकर माघार घ्यायला तयार नसल्याने आता शासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेऊन निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक बघायला मिळत आहेत.

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेने बुलढाण्यात जाऊन रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिलाय. मात्र राज्य सरकार तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा अंत न पाहता तात्काळ त्यांच्या मागणीची दखल घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिलाय.

यावेळी अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, सुभाष पाटील करंजुले, अन्सार पटेल, वसंत साठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment